loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेच्या मुला-मुलींची जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी

रत्नागिरी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शासकीय सॉफ्टबॉल स्पर्धेत शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेच्या खेळाडूंनी अभूतपूर्व यशाची नोंद केली आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत प्रशालेच्या अंडर-१४ आणि अंडर-१७ या दोन्ही वयोगटांतील मुलींच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून विभाग स्तरावर दिमाखात धडक मारली आहे. याच स्पर्धेत प्रशालेच्या मुलांच्या अंडर-१४ व अंडर-१७ वयोगटातील संघांनीदेखील अत्यंत उत्कृष्ट व मैदानी कौशल्याचे प्रदर्शन करत जिल्हा स्तरावर उपविजेतेपद मिळवले. मुला-मुलींच्या या दुहेरी आणि ऐतिहासिक यशाने सैतवडे परिसराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg