loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार किरण सामंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद; वेरळ येथे बंधारे बांधण्यास प्रारंभ

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी केलेल्या आवाहनाला लांजा तालुक्यातील शिवसैनिक आणि ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या उपक्रमांतर्गत वेरळ शिवसेना शाखेच्या वतीने विविध प्रकारचे बंधारे बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी विविध ठिकाणी बंधारे उभारण्याचे आवाहन आमदार किरण सामंत यांनी केले होते. या आवाहनानुसार लांजा तालुक्यात शिवसैनिक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेत जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडविण्यासह भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वेरळ येथे बंधारे बांधण्याच्या शुभारंभप्रसंगी तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, सभापती मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य मनिषा राखण, पंचायत समिती सदस्य दिपाली साळवी, ग्रामपंचायत सदस्य शरद चरकरी, सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच इक्बाल टोळे, वेरळ शाखाप्रमुख सीताराम पातेरे, उपशाखाप्रमुख दिपक खामकर, शामसुंदर पाताडे, महिला शाखा संघटिका स्मिता खामकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शाखा संघटनेचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg