loader
Breaking News
Breaking News
Foto

हळबे महाविद्यालयात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व डिस्पोजल मशीनचे लोकार्पण

दोडामार्ग, (प्रतिनिधी) : कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या वतीने लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग मध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. या सुविधांमुळे विद्यार्थिनींना आवश्यकतेच्या वेळी सॅनिटरी पॅड सहज उपलब्ध होणार असून वापरलेल्या पॅडची सुरक्षित व स्वच्छ पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी विद्यार्थिनींच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन या सुविधा महाविद्यालयात उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून कसई-दोडामार्ग नगरपंचायतीशी समन्वय साधण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगरपंचायतीने सामाजिक बांधिलकीतून या दोन्ही मशीन महाविद्यालयाला उपलब्ध करून दिल्या. या सहकार्याबद्दल प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी नगरपंचायतीचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या मशीनचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संकेत गायकवाड, शिक्षण सभापती संजना म्हावळणकर, नगरसेविका संध्या प्रसादी, नगरसेविका दीपा गवस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान जाधव होते. मान्यवरांच्या उपस्थितीत नगरसेविका संध्या प्रसादी यांच्या हस्ते सॅनिटरी पॅड व्हेंडिंग व डिस्पोजल मशीनचे उद्घाटन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि मासिक पाळीविषयक जागरूकतेला चालना देणारा आहे. महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींसाठी अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास या सुविधांची निश्चितच मदत होईल, अशी भावना प्रसादी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सेफाली गवस, तर सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. श्रुती पडवळ यांनी केले. यावेळी नगरपंचायतीचे निवेद कांबळे, सिद्धेश शेगले, संजय शिरोडकर, प्रणाली शेटकर व सुरेखा ताटे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg