loader
Breaking News
Breaking News
Foto

भाऊबीज उत्साहात साजरी,एकत्र येण्याने नात्याची वीण आणखी घट्ट

चौक, (अर्जुन कदम) आज भाऊबीज हा सण अतिशय आनंदात भाऊ अणि बहिणी यांनी एकत्र येऊन साजरा केला. हल्ली स्थावर मालमत्तेच्या माध्यमातुन दुरावा निर्माण झाला आहे.त्यात अस कुटुंबसांभाळून ठेवणेआवश्यकआहे,अशी भावना निर्माण झालीआहे. भाऊबीज हा जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे प्रतीक असलेला सण आहे. याला यमद्वितीया असेही म्हटले जाते.बहीण आपल्या भावाला ओवाळते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते. ओवाळल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला प्रेमाने काहीतरी भेटवस्तू देतो आणि तिच्या संरक्षणाचे वचन देतो. पौराणिक कथेनुसार, सूर्यपुत्र यमराज हे आपली बहीण यमुना हिच्याकडे कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी भोजनासाठी गेले होते. यमुनेने यमराजाचा अतिशय आदरसत्कार करून त्यांना भोजन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे प्रसन्न होऊन यमराजाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा यमुनेने मागितले की,आजच्या दिवशी ज्या बहिणी आपल्या भावाला जेवायला बोलावतील आणि ओवाळतील, त्यांना तुझी भीती वाटू नये. यमराजाने तथास्तु म्हटले. तेव्हापासून हा सण यमद्वितीया किंवा भाऊबीज म्हणून साजरा केला जातो.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg