मालवण (प्रतिनिधी) - मालवण बंदर जेटी नजीकच्या पार्किंग जागेत गेट घालून बंद करण्यात आलेले पारंपरिक मार्ग त्वरित मोकळे करावेत, या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या नेतृत्वाखालील 'मालवण मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित' च्या शिष्टमंडळाने तसेच नागरिकांनी बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. बंदर जेटी येथील पार्किंग क्षेत्रात 'हॉटेल सागर किनारा' साईडला व 'भाजी मार्केट' साईडला गेट बसवून जाण्या-येण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. या बंद केलेल्या मार्गावरून पूर्वी मच्छिमार व्यावसायिक आपली मच्छी, इतर सामान तसेच हातगाडी व दुचाकी सहजपणे घेऊन जात असत. मात्र, हा मार्ग अचानक बंद केल्यामुळे विशेषतः छोट्या मच्छिमारांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर मच्छिमार, पर्यटक व स्थानिकांच्या सुविधेसाठी सागर किनारा हॉटेल कडील गेट ४ फूट आणि भाजी मार्केट कडील गेट ४ फूट उघडे ठेवावे, अशी ठाम मागणी शिष्टमंडळाने केली आहे. तसेच सीमा शुल्क विभाग कार्यालय व जिल्हा परिषद विश्रामगृह या दरम्यान असलेला मार्ग हा स्थानिक मच्छिमार सभासदांचा वंशपरंपरागत चालत आलेला रस्ता आहे. त्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी पूर्णपणे मोकळा करून पूर्ववत खुला करण्यात यावा, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. भविष्यात या विषयावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जातीने लक्ष देऊन मच्छिमार, पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना त्वरित न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिष्टमंडळात मालवण मच्छिमार सहकारी संस्थेचे विकी चोपडेकर, दीपक तांडेल, जॉमी ब्रिटो, संतोष शिरगावकर, जॉन्सन ब्रिटन, सिद्धेश मलिये, अनमोल आढाव, सुशांत कोचरेकर, करण कुबल, कासम बांगी, मोसिन शेख, समद मुकादम, फारुख मुकादम, दरवेश आचरेकर, गौरव जोशी, अनिकेत जोशी, अजिंक्य गिरी, किशोर खानोलकर, परेश धुरी, प्रदिप मालवणकर, अवधूत परुळेकर, महेश कुर्ले, अमेय बादेकर आदी उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.