loader
Breaking News
Breaking News
Foto

ऑॅक्टोबर हिटचा थेट परिणाम महावितरणच्या वीज पुरवठयावर, वीजेची मागणी तब्बल २० मेगावॅटने वाढली, ३८ कोटी थकबाकीः अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव

रत्नागिरी, : जिल्ह्यात जाणवू लागलेल्या तीव्र ’ऑक्टोबर हिट’चा थेट परिणाम महावितरणच्या वीज पुरवठा आणि मागणीवर झाला आहे. उकाड्यामुळे पंखे, एसी आणि कुलरचा वापर वाढल्याने एरवी नियमित १६० मेगावॉट असणारी विजेची मागणी तब्बल २० मेगावॉटने वाढून १८० मेगावॉटवर पोहोचली आहे. मागणीतील या अचानक झालेल्या वाढीसोबतच जिल्ह्यात सुमारे ३८ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी सांगितले. ऑक्टोबर हिटमुळे जिल्ह्यात उष्णतेचा पार सुमारे ३४ ते ३५ डी. से.वर पोहचला आहे. यामुळे दिवसभर उन्हाच्या चटक्याने अंगाची लाहीलाही होत आहे. थोडासा दिलासा मिळावा यासाठी विविध इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर वाढला आहे. परिणामी विजेच्या मागणीत २० मेगावॉटने वाढ झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्ह्यात अधिकृतपणे कोणतेही भारनियमन लागू करण्यात आलेले नाही. मात्र, केवळ रत्नागिरीतच नव्हे, तर संपूर्ण राज्यातच अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात विजेची मागणी वाढली आहे. यामुळे वीज निर्मिती आणि मागणी यात तफावत निर्माण होऊन काही वेळा तात्पुरत्या स्वरूपात विद्युत पुरवठा खंडित करावा लागत आहे. ही परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे तांत्रिक पथक सातत्याने कार्यरत आहे. जिल्ह्यात महावितरणची दरमहा एकूण वीजबिल मागणी सुमारे १४० कोटी रुपयांची असते. परंतु, विविध वर्गवारीतील ग्राहकांकडून ३८ कोटी रुपयांची थकबाकी अजूनही येणे बाकी आहे.

टाईम्स स्पेशल

यामध्ये रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमधील स्ट्रीट लाईटची (रस्त्यावरील दिवे) थकबाकी तब्बल ७ कोटी ३९ लाख रुपये आहे, तर विविध सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांची ४ कोटी २१ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी राहिली आहे. जिल्ह्यात महावितरणचे सर्व प्रकारचे मिळून एकूण ६ लाख १० हजार ग्राहक आहेत. यापैकी विविध शासकीय कार्यालये आणि संस्थांकडील प्रशासकीय थकबाकीचा आकडा ५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणच्या महसुलावर मोठा ताण येत असून, वीज पुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी थकीत वीजबिलांचा भरणा त्वरित करावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाच्या वतीने अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg