संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘वाचन कट्टा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रंथपाल गौरी भोसले यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात ज्ञानाची भूक वाढावी आणि वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने वाचन कट्टा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध विषयांवरील पुस्तके वाचावीत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संतोष खरे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाचनामुळे व्यक्तीच्या ज्ञानात भर पडते, विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकांपुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय लावून घ्यावी. विविध विषयांवरील पुस्तके वाचल्यामुळे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो, असे त्यांनी सांगितले. प्रभारी प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनातून आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले.
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सतत नवनवीन गोष्टी शिकणे आवश्यक आहे. पुस्तकांचे वाचन हे ज्ञानप्राप्तीचे प्रभावी साधन असून, वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यात, आकलनशक्तीत आणि आत्मविश्वासात वाढ होते. विद्यार्थ्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन वाचनाची नियमित सवय जोपासावी, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला प्रा. राजवाडे, प्रा. पृथ्वीराज वाडकर, प्रा. भिकाजीराव बेहरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रसिका खातू यांनी मानले.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.