loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल दापोली दौऱ्यावर; उपविभागीय अधिकारी कार्यालयाला सदिच्छा भेट

दापोली (वार्ताहर) : राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी आज त्यांच्या दापोली दौर्यात दापोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. राजेश अगरवाल यांनी त्यांच्या प्रशासनिक सेवेची सुरुवात दापोली येथे उपविभागीय अधिकारी (सहाय्यक जिल्हाधिकारी ) या पदापासून केली ते दापोली येथे या पदावर १९९१ ते १९९२ या काळात होते. त्यानंतर त्यांनी राज्यात तसेच दिल्ली येथील केंद्र सरकारच्या विविध विभागामध्ये सेवा केली असून सेवाष्ठतेनुसार त्यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज ते सपत्नीक दापोली दौर्यावर आले होते. या दौर्यात त्यांनी हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ला, हर्णे येथील बांधकाम सुरु असलेली जेटी, गिम्हवणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व त्यानंतर दापोली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे भेट दिली. त्यांचे दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वागत केले. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे हे या दौर्यात त्यांच्या सोबत होते.

टाईम्स स्पेशल

डॉ. सूर्यवंशी यांनी अगरवाल यांना ते दापोली येथील सेवेत असताना त्यांनी दिलेल्या केसेसचे स्वहस्ताक्षरात लिहिलेले निकालपत्र अजुनहि कसे या कार्यालयाने सुरक्षित जतन करून ठेवलेले आहे ते दाखवले. त्यावर अगरवाल यांनी समाधान व्यक्त केले. त्याकाळातील सेवेतील अनुभव त्यांनी उपस्थिताना सांगितले. दापोली उपविभागाच्या वतीने अगरवाल यांना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी दापोलीच्या तहसिलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश गणेश मंडलिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg