loader
Breaking News
Breaking News
Foto

मोहाने सामाजिक मंडळ, मुंबई यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल, मोहाने विद्यालयाला ४३ इंची LED TV भेट

खेड - मोहाने सामाजिक मंडळ, मुंबई यांच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, मोहाने विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व ओळखून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त ४३ इंची LED TV संच पवित्र घटस्थापनेच्या शुभदिनाचे औचित्य साधून भेट म्हणून देण्यात आला. मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुनील गणपत मोरे, दीपक शिवराम मोरे, उमेश भिवाजी मोरे, जगदीश मोरे, बळीराम भागोजी मोरे तसेच मोहाने येथील ग्रामस्थ रामचंद्र मोरे, सुदर्शन कदम, ज्ञानेश्वर मोरे, राजाराम मोरे, दीपक सोंडकर, दीपक मोरे, बाबुराव मोरे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय नायकल यांच्याकडे हा TV संच सुपूर्द करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मोहाने सामाजिक मंडळ, मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचा विद्यालयाच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य विष्णु मोरे, मारुती जंगम, शशिकांत मोरे तसेच सहाय्यक शिक्षक समीर भोसले आणि विद्यालयाचे शिपाई दगडू म्हाब्दी उपस्थित होते. विद्यालयाचे लिपिक शत्रुघ्न मोरे यांनी सामाजिक मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मंडळाच्या सर्व सदस्यांचे आणि देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg