loader
Breaking News
Breaking News
Foto

वेरवली बुद्रुक वृद्ध महिला हत्या प्रकरण: संशयित आरोपी प्रमोद खेडेकरच्या पोलीस कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ

लांजा (संजय साळवी) - तालुक्यातील वेरवली - बुद्रुक येथील लाडवाडी रामगाव परिसरात वृध्द महिलेचा खून करून सोन्याचे दागिने चोरल्याच्या प्रकरणातील आरोपी प्रमोद खेडेकर याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने शुक्रवार दि.३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील वेरवली बुद्रुक लाडवाडी येथे १९ ऑक्टोबर रोजी चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना लांजा पोलिसांनी संशयित प्रमोद खेडेकर याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली होती. तपासादरम्यान आरोपीने चोरीच्या उद्देशाने खून केल्याची कबुली दिली होती.

टाईम्स स्पेशल

त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला त्याला मंगळवार दि.२७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली होती. तर मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पुन्हा शुक्रवार दि. ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg