चिपळूण : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने कला क्षेत्रासह सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एका संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाना पाटेकर यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या आठवणी सांगताना चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम भावुक झाले. “नाना पाटेकर यांच्यासारखा दिलदार आणि माणुसकी जपणारा व्यक्ती पुन्हा होणे नाही. त्यांचे कार्य कायमस्वरूपी स्मरणात राहील,” अशा शब्दांत आमदार निकम यांनी नानांना श्रद्धांजली अर्पण केली. गणेशोत्सवाच्या आनंदमय वातावरणात आमदार शेखर निकम यांनी नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले होते. यावेळी नाना पाटेकर यांनी आमदार निकम यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले. यावेळी नाना पाटेकर यांनी आमदार शेखर निकम यांच्या खांद्यावर आपुलकीने हात ठेवत अत्यंत जिव्हाळ्याने त्यांचे स्वागत केले होते. या भेटीत दोघांमध्ये विविध विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. नानांनी स्वतःच्या हाताने मिसळ तयार करून आमदार निकम यांना प्रेमाने खाऊ घातली. त्यांच्या या आपुलकीच्या आदरातिथ्याची आठवण सांगताना आमदार निकम यांचे मन भरून आले.
या भेटीदरम्यान चिपळूणशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवरही चर्चा झाली होती. चिपळूणच्या गाळाचा प्रश्न, धनगरवाड्यांचे पुनर्वसन, पाणी समस्या तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी याबाबत नाना पाटेकर यांनी विशेष आस्था व्यक्त केली होती. चिपळूणच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण शक्य ते सर्व सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती. नानांसोबत झालेली ती चर्चा आमदार शेखर निकम यांच्या मनात कायमची घर करून राहिली. मात्र, आज नाना आपल्यात नसल्याने त्या चर्चेतील अनेक विषय अपूर्ण राहिल्याचे शल्य आमदार निकम यांनी व्यक्त केले. “नानांसोबत झालेली ती भेट आजही डोळ्यासमोर उभी राहते. त्यांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले, स्वतःच्या हाताने मिसळ करून खाऊ घातली आणि चिपळूणच्या प्रश्नांवर भरभरून चर्चा केली. चिपळूणसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ जाणवत होती. त्या वेळी झालेली चर्चा आता केवळ आठवण बनून राहिली आहे, याचे मनापासून दुःख वाटते,” असे आमदार निकम यांनी सांगितले. नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा विशेष उल्लेख करताना आमदार निकम म्हणाले की, नाना केवळ पडद्यावरील अभिनेते नव्हते, तर सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी जोडलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. समाजातील वंचित, गरजू आणि ग्रामीण भागातील प्रश्नांविषयी त्यांना नेहमीच आस्था होती.
“नानांसारखा दिलदार माणूस पुन्हा जन्माला येणे कठीण आहे. अशा व्यक्ती फार कमी पाहायला मिळतात आणि त्या व्यक्तींमध्ये नाना पाटेकर यांचे स्थान निश्चितच वेगळे होते. नानांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शैलीत या जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कायम जाणवत राहील,” अशी भावना आमदार निकम यांनी व्यक्त केली. नाना पाटेकर यांनी अभिनय क्षेत्रात निर्माण केलेला ठसा तर अजरामर आहेच; मात्र त्यापलीकडे त्यांनी सामाजिक जाणिवेतून केलेले कार्य, गरजूंसाठी उभे राहण्याची भूमिका आणि माणुसकीची जपलेली नाळ ही त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव पुढील अनेक पिढ्यांवर राहील. “नाना पाटेकर यांचे कार्य चिरंतर स्मृतीत राहील. त्यांचे विचार, त्यांची माणुसकी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ कायम प्रेरणा देत राहील,” अशा शब्दांत आमदार शेखर निकम यांनी दिवंगत नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.