loader
Breaking News
Breaking News
Foto

बळीराजाच्या पाठीशी जिल्हा परिषद भक्कम उभी राहील - अध्यक्षा अस्मिता केंद्रे

चिपळूण (ओंकार रेळेकर) - शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेती व्यवसाय हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा मानला जातो. त्यामुळे बळीराजाच्या समस्या आणि त्यांच्या परिश्रमाचे चीज झाले पाहिजे. कळवंडे आणि परिसरातील शेतकरीवर्ग शेतीला पूरक व्यवसाय करणारे आहेत. त्यांना सुविधा देण्यासाठीच आम्ही कटिबद्ध आहोत, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात पुढे जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे म्हणाल्या, लोकप्रतिनिधींनी आदर्श ठेवला तरच शेतकरी प्रगत होईल. शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जिथे कमी पडेल तिथे आम्ही आहोत. शासनाच्या योजना मोफत असतात त्यांचा लाभ घ्या. मोफत धान्य योजनेमुळे शेतकरी सुखाने दोन वेळचे अन्न खातो. जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये कृषी खात्याला भरघोस निधी दिला आहे. तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. कृषि विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगाम मार्गदर्शन व आढावा सभा उद्योजक वसंत उदेग यांच्या वर्षा बंगला निवासस्थानी, कळवंडे-सातीनवाडी येथे पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी आमदार संजय कदम म्हणाले, कळवंडे हे कृषिप्रधान गाव आहे. इथे ८० ते ९० टक्के शेतकरी आहेत. पाणंद रस्ते हेच खरे रस्ते आहेत. २३ नंबरला नोंद असलेले जुने रस्ते मोकळे करण्यासाठी तहसीलदारांकडे जावे, अडचण आल्यास आमच्याकडे या आम्ही सहकार्य करू. कृषि, पशुसंवर्धन व दुग्धविकास सभापती महेश नाटेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्न आठ दिवसात निकाली काढा, नाहीतर खुर्च्या सोडा, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. कळवंडे हे भाजीपाल्याचे कोठार आहे, इथला शेतकरी पुरस्कार प्राप्त आहे, त्याला सक्षम करणे हेच माझे उद्दिष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उद्योजक व प्रगतशील शेतकरी वसंत उदेग यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. पाणी अडवणूक, शासकीय अनुदान, डुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, पावर टिलरसाठी अर्ज करूनही मंजुरी न मिळणे, चिपळूण दुष्काळग्रस्त असूनही पंचनामे न होणे, न्याडप योजनेत ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून त्रुटी काढून पैसे न देणे, फार्मर आयडीसाठी हेलपाटे, बक्षीसपत्राची अट, २३ नंबर नोंद आदी मुद्द्यांवर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. योजना फक्त कागदावर नको, अंमलबजावणी हवी, असे त्यांनी ठणकावले. सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, माजी आमदार सदानंद चव्हाण, संजय कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती मयुरी शिर्के, पंचायत समिती सभापती शशिकांत खेतले, उपसभापती संदेश आयरे, सदस्य सायली वाजे, पूजा जावळे, जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, समन्वयक शशिकांत वाघे, तालुकाप्रमुख रुपेश घाग, दिलीप चव्हाण, उद्योजक दयाळ उदेग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg