loader
Breaking News
Breaking News
Foto

चित्रकला स्पर्धेत बोडदे शाळेची कीर्ती जाधव तालुक्यात प्रथम!

तिलारी (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, बोडदे येथील विद्यार्थिनी कीर्ती जगन्नाथ जाधव हिने दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे बोडदे गावासह शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे. या चित्रकला स्पर्धेमध्ये केंद्र व तालुका स्तरावरील परीक्षकांच्या निरीक्षणातून कीर्तीच्या चित्रकलेतील कौशल्याची दखल घेण्यात आली. तिच्या कलागुणांना मिळालेल्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कीर्तीने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक आणि शाळा परिवाराचे अभिनंदन केले जात आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, बोडदे येथील विद्यार्थी शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रांत सातत्याने यश संपादन करत आहेत. या यशस्वी वाटचालीबद्दल बोडदे गावातील तसेच गोवा, पुणे, मुंबई आणि अन्य ठिकाणी वास्तव्यास असलेल्या गावातील मान्यवरांनी समाधान व्यक्त केले आहे. कीर्तीचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, तिच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg