loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणच्या शाश्वत विकासासाठी साने गुरुजी विचार मंच लांजा कटिबद्ध

केळंबे-लांजा, (सिराज नेवरेकर) - साथी किशोर पवार जन्मशताब्दी निमित्त एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आयोजित कोकणचा शाश्वत विकास या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विचार मंच, लांजा यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या चर्चासत्रात महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून अनेक मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चर्चासत्राच्या उत्तरार्ध रत्नागिरी नवनिर्माण कॉलेजचे संस्थापक अभिजीत हेगशेटे यांनी आजच्या कोकणाच्या शाश्वत विकासाबाबत उपाय आणि जबाबदार्‍या यावर अभ्यासपूर्वक विचार मांडून लोकांमध्ये एक नव चैतन्य निर्माण केले तर व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित करताना देवरूखचे युयुत्सु आर्ते यांनी आज कोकणातला माणूस जगला पाहिजे याकरता सांघिक भावना वाढीस लावावी आणि त्यातून राष्ट्रप्रेम निर्माण करावे, असे विचार मांडलले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकताच ऍड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई साहित्य संघ यांच्या वतीने झालेल्या सत्कार निमित्त त्यांना साने गुरुजी विचार मंच,लांजा यांच्या वतीने शाल देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमासाठी लांजा येथील जेष्ठ साथी विश्वनाथ उर्फ बबन मयेकर यांच्या नेतृत्वाखाली नाना मानकर, चंद्रकांत परवडी, सुधाकर कांबळे, अल्लाउद्दीन नेवरेकर, संतोष जाधव, किशोर कांबळे, यासीन नेवरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg