loader
Breaking News
Breaking News
Foto

फणसवणे मंडळ कार्यालयाअंतर्गत ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : शासनाच्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना, सुविधा व आवश्यक प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ फणसवणे येथे उत्साहात पार पडले. मंडळ कार्यालय फणसवणे यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, प्रमाणपत्रे तसेच विविध महसूलविषयक कामांसाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रामपंचायत फणसवणे वlडावेसराड च्या सरपंच उषा गुरव, मंडळ अधिकारी ए. जी. कदम, ग्राम महसूल अधिकारी ए. जी. जाधव, संपदा खामकर, सुमिता पाटील, शुभम ठाकरे, आकाश वावरे तसेच पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र खानविलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी नागरिकांकडून विविध प्रकारचे अर्ज स्वीकारण्यात आले. संबंधित अर्जांवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारण्याची गरज न पडता गावातच नागरिकांच्या विविध प्रशासकीय कामांना चालना मिळाली. दरम्यान, अभियानांतर्गत ग्रामस्थांना डिजिटल स्वाक्षरी केलेले सातबारा उतारे तसेच फेरफार उताऱ्यांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या योजनांचा व महसूलविषयक सुविधांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे अभियान उपयुक्त ठरल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg