loader
Breaking News
Breaking News
Foto

शाहनवाज शाह यांची कोकण विभाग जलयोद्धा पदी नियुक्ती

चिपळूण (संतोष पिलके) : जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन, जलसाक्षरता आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे चिपळूणचे स्थापत्य अभियंता व जलअभ्यासक शाहनवाज शाह यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार कोकण विभाग जलयोद्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यशदा, पुणे येथील जलसाक्षरता समितीच्या प्रक्रियेनंतर १७ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाह यांनी २०१६ पासून जलसाक्षरता अभियानांतर्गत चिपळूण तालुक्याचे जलदूत म्हणून काम पाहिले आहे. शासनाच्या 'चला जाणू या नदीला' अभियानांतर्गत वाशिष्ठी व जगबुडी नदीचे समन्वयक म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. सुमारे ७० ग्रामपंचायतींमध्ये जलजागृतीचे काम त्यांनी केले आहे. धरणांमधील गाळ काढणे, नाले व ओढे मोकळे करणे, नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा व आंदोलने केली आहेत.

टाईम्स स्पेशल

चिपळूण शहरातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या नारायण तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी ग्लोबल चिपळूण आणि तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे पाठपुरावा करून स्वखर्चाने तलावाचे डिझाईन तयार केले. २०२१ च्या महापुरानंतर चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून पूरप्रश्नांबाबत तांत्रिक बाजू शासनासमोर प्रभावीपणे मांडली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून वाशिष्ठी, शिव नदी तसेच विविध गावांमध्ये गाळ उपसा आणि जलसंवर्धनाच्या कामातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg