loader
Breaking News
Breaking News
Foto

तळवडे गावचे सुपुत्र संदीप बारसकर यांचा मुंबईत सन्मान!

पाचल (सुरेश गुडेकर) : तळ गावचे सुपुत्र, युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संदीप बारसकर यांनी मुंबई येथे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ओम दत्तात्रय क्रीडा मंडळाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लक्ष्मीमातेचे दर्शन देखील घेतले. मंडळाच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करून मंडळाला शुभेच्छा दिल्या. ओम दत्तात्रय क्रीडा मंडळ, काळेवाडी परळ यांच्यावतीने संदीप बारसकर यांचा मंडळाच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते सुरेश गावडे, दत्ताराम पवार ओमकार पोंगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या गावाचा नावलौकिक मुंबईतही उंचावणाऱ्या संदीप बारसकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg