loader
Breaking News
Breaking News
Foto

पं.स. शिक्षण विभाग संगमेश्वर व सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - शिष्यवृत्ती सारखी मुलांना अवघड समजली जाणारी परीक्षा ही आधुनिक युगातील स्पर्धा परीक्षेचा मजबूत पाया कयणारी शिष्यवृत्ती परीक्षा होय, व याचेच महत्त्व ओळखून शिक्षण विभाग पंचायत समिती संगमेश्वर व एस,आय. ग्रुप इंडिया लिमिटेड पुरस्कृत सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने इ.चौथी व सातवीला शिष्यवृत्ती मार्दर्शन करणाऱ्या तालुक्यातील सर्व शिक्षकांची कार्यशाळा पाध्ये स्कूल देवरुख व न्यू इंग्लिश स्कूल देवरुख येथे नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेची सुरुवात तालुक्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय पाटील, गटशिक्षणाधिकारी विजय परीट, व हायस्कूल मुख्याध्यापक कोकणी, श्रीमती नारकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी कोसुंब हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत राऊत यांनी आयोजनाचा हेतू तळमळीने स्पष्ट केला. संबंधित संस्थेविषयी ध्येय व माहिती याबद्दल संस्था प्रतिनिधी शैलेश कदम यांनी दिली. संपूर्ण दिवसभरात इ. चौथी कार्यशाळेसाठी ज्ञानदीप खेड येथील तज्ञ मार्गदर्शक मगदूम, टेंबे, वाघमोडे यांनी विषया प्रमाणे विविध प्रकारची उदाहरणे व दाखले देऊन सखोल मार्गदर्शन केले. सातवीच्या कार्यशाळेसाठी कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील सत्तापा शिरवाडे, नामदेव निकम, सचिन देसाई, हर्षद जाधव,व प्रदीप पाटील यांनीही बुद्धिमत्ता व गणित या अवघड असणाऱ्या विषयांवर चर्चा करून अनुभव उदाहरणे दाखले व विद्यार्थी अंदाज लक्षात घेऊन सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कार्यशाळेत असणारे प्रशिक्षणार्थी शिक्षक यांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या कार्यशाळेच्या दरम्यान संगमेश्वरच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी उपस्थित राहून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी विजय परीट यांनीही संगमेश्वर तालुक्यातील शिष्यवृत्ती निकाल अधिक उंचावून शंभर टक्के लागेल असा आशावाद व्यक्त करून संयोजनासाठी आर्थिक सहकार्य केल्या बद्दल, तसेच उपस्थित प्रशिक्षणार्थींची भोजन व्यवस्था, तसेच तालुका स्तरीय तीन सराव परीक्षा व विशेष मुलांना अधिक मार्गदर्शन वर्गाचा संपूर्ण भार सेवा सहयोग फाउंडेशन ला व एस आय ग्रुप ला धन्यवाद दिले. या कार्यशाळेसाठी तालुक्यातून ४५० शिक्षक, सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील करंबळे व विलास कानर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विषयतज्ञ समीर काब्दुले यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी पंचायत समिती संगमेश्वर शिक्षण विभाग व एस. आय. ग्रुप सेवा संहयोग फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी पथक मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg