loader
Breaking News
Breaking News
Foto

कुणाशीही जातीपातीवरून भेदभाव न करण्याचा विचार माझ्या आईवडिलांनी मला दिला…तोच विचार मी आजवर जपत आलोय : पालकमंत्री नाम.उदय सामंत

रत्नागिरी, ( संतोष कांबळे) “ माझ्या आईवडिलांनी माझ्यावर जातीपातीवरून भेद न करण्याच्या केलेल्या संस्कारामुळेच माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे मी समान भावनेने पाहतो…काम करताना आजवर मी कधीही जात धर्म पंथ पाहिलेले नाही आणि तेच मला माझ्या आईवडिलांनी शिकवलं आहे …असे सांगतानाच, सर्वात मागे राहिलेल्या भटक्या विमुक्त समाजातील लोकांना यापुढे प्राधान्याने न्याय देण्याची भूमिका शासनाची आहे,त्यासाठीच भटके विमुक्त हक्क अभियान सुरू करण्यात आले असून या अभियानात साऱ्या यंत्रणेने भटक्या विमुक्त समाजाशी संवेदनशिलतेने वागुन त्यांना आवश्यक ती प्रमाणपत्रे मिळवून द्यावीत असे आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री व उद्योगमंत्री नामदार डॉ.उदय सामंत यांनी केले.राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा संकल्प अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे मिळण्यासाठी “भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान” या विशेष मोहिमेचे आयोजन आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महसूल व इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत कुवारबाव येथे आयोजित भटके विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी हे आवाहन केले. कार्यक्रमाला रत्नागिरीचे प्रांत जीवन देसाई,तहसिलदार राजाराम म्हात्रे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदय गायकवाड, कुटबु समाजाचे नेते बाबूशा मोरे,जिल्हा परिषद सदस्य महेंद्र झापडेकर,प्रकाश रसाळ , इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अपूर्वा कारंडे यांच्यासह शासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधी मंचकावर उपस्थित होते.भटक्या विमुक्तांची तुडुंब गर्दी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आपल्या लहानपणीच्या आठवणी जागविताना, माझ्या आईवडिलांनी सर्वांशी समानतेने वागण्याचा दिलेला अनमोल विचार मी आजही जपत असल्याचे अभिमानाने नमूद केले.नामदार उदय सामंत पुढे म्हणाले, माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही दुजाभाव केलेला नाही. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला.आपल्या भाषणात त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इस्त्रो नासा सारख्या अंतराळ संस्थेत जाता यावे यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने माझ्या पुढाकाराने सुरू केलेल्या विशेष स्पर्धा परीक्षेच्या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाल्याचे नमूद करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

टाइम्स स्पेशल

पालकमंत्री नाम.उदय सामंत यांनी मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात बिनधास्त भाषण केलेल्या लांजा तालुक्यातील कुवे गावच्या पाचवीत शिकणाऱ्या खुशी नेमण या छोट्या मुलीच्या स्वप्नाचा आवर्जून उल्लेख केला. ग्रामीण भागातील मुलं मोठी स्वप्नं पाहत आहेत…खुशी नेमणला जिल्हाधिकारी व्हायचं आहे. ग्रामीण भागातील अशा असंख्य मुलामुलींची भव्य स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते मी करेन असा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला तेव्हाही अवघं सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं.पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते एक वर्षापूर्वी इस्त्रो नासाला जाऊन आलेल्या संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावच्या समीक्षा सुरेश बोडेकर हिचा विशेष सत्कार करण्यात आला. विशेष सन्मानानंतर समीक्षा बोडेकर हिने केलेल्या उत्स्फूर्त भाषणाने सारं सभागृह अवाक झालं. पालकमंत्र्यांनी समीक्षाचे तोंडभरून कौतुक केले आणि नासाला गेलेल्या पहिल्या तुकडीच्यावेळी ग्रामीण भागातील साध्या गरीब पालकांना मुलींना इतक्या दूर पाठवण्यासाठी कशी समजूत काढावी लागली होती त्याचाही किस्सा आवर्जून सांगितला.निवे आश्रमशाळेच्या मुलींनी सादर केलेल्या स्वागत गीताचेही पालकमंत्र्यांनी स्तुती केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg