loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक रक्तदान दिनानिमित्त रत्नागिरीत शासकीय तंत्रनिकेतन व श्री सत्यसाई सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम

रत्नागिरी (जमीर खलफे) - मानवी जीवनाचे रक्षण करणार्‍या आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणार्‍या ’रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या उदात्त विचाराचा अंगीकार करत, जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून श्री सत्यसाई सेवा समिती, रत्नागिरी आणि ऍल्युम्नि असोसिएशन ऑफ गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी येथील औषधशास्त्र निर्माण विभागाच्या प्रांगणात गुरुवारी अत्यंत उत्साहात आणि सुसंवादी वातावरणात पार पडलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाला रत्नागिरीकर नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. तरुण पिढीमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि निस्वार्थ समाजसेवेचे संस्कार रुजावेत, या हेतूने या उपक्रमाची नियोजनबद्ध आखणी करण्यात आली होती. सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या निर्धारित वेळेत पार पडलेल्या या शिबिरात सुरुवातीपासूनच रक्तदात्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg