loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा घाट घटस्थापनेच्या मुहूर्तावर जड वाहनांसाठी चालू करा, अन्यथा आम्ही जबरदस्तीने चालू करू - आमदार भैय्या सामंत

देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील अतिवृष्टीमुळे जड वाहनांसाठी बंद असलेली वाहतूक आंबा घाटातून घटस्थापनेच्या मुहूर्तावर त्वरित चालू करा, अन्यथा ती मला येऊन चालू करावी लागेल, असे आमदार भैया सामंत यांनी साखरपा येथील समस्या निवारण सभेत संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. अतिवृष्टीच्या दणक्याने आंबा घाटातील रस्ता खचला. एक साईड कोसळली त्यामुळे जड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करण्यात आली त्यामुळे व्यापारी वर्गाची फार मोठी अडचण झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र आता पाऊस कमी असून उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे घाट कोसळण्याची भीती ही कमी झाली आहे, अशा परिस्थितीत व्यापारी वर्गाची मागणी पाहता जड वाहनांसाठी वाहतुकीसाठी आंबा घाट त्वरित रस्ता चालू करावा, अशा सूचना बांधकाम विभाग यांना भैय्या सामंत यांनी या सभेचे दिल्या. घटस्थापनेच्या मुहूर्तावर रस्ता चालू करा अशा सूचना देऊन जर हा रस्ता घटस्थापनेच्या दिवशी सुरू झाला नाही तर मी स्वतः येऊन हा रस्ता खुला करेन असा इशारात आमदार भैय्या सामंत त्यांनी दिला. आता घटस्थापनेच्या दिवशी रस्ता चालू होणार की संबंधित कार्यालयीन बाबी पूर्ण करून आंबा घाटातील जड वाहनांसाठी असणारी वाहतूक सुरू होणार याकडे वाहनधारकांचे व व्यापारी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg