loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकमान्य वाचनालय लांजा संस्थेतर्फे साहित्यिक पाककला स्पर्धा उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थेच्यावतीने आयोजित तालुका मर्यादित महिलांसाठी साहित्यिक पाककृती स्पर्धेत सौ स्वप्नाली संजय भागवत यांनी प्रथम क्रमांक पटकविला. ही स्पर्धा रविवारी लांजा येथे लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन वाचनालयाचे सल्लागार विजय बेर्डे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजनाने झाले. यावेळी वाचनालयाच्या संचालिका विजयालक्ष्मी देवगोजी, सौ. ललिता भिंगे, सौ. अर्चना पेणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत लांजा तालुक्यातील सौ. स्वप्नाली संजय भागवत यांनी प्रथम क्रमांक, फरवीन असिफ मुलांनी यांनी द्वितीय क्रमांक तर श्रीमती सुप्रिया चंद्रकांत बापट यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तर सौ. मनीषा मंगेश चौगुले आणि नीलम राकेश कोळवणकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला विजेत्या प्रथम क्रमांकास रुपये १५०० आणि पुस्तक, द्वितीय क्रमांकास रुपये १००० आणि पुस्तक, तृतीय क्रमांकास रुपये ७५० आणि पुस्तक तर उत्तेजनार्थ क्रमांक प्रत्येकी ५०० रुपये आणि पुस्तक अशी बक्षीसे मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg