loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवा संकल्प अभियानांतर्गत कुंभारखाणी येथे वृक्षारोपण

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत कुंभारखाणी बु. प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर कुंभारखाणी बु. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारखाणी बु.नं.१ यांच्या संयुक्त विद्यमाने “सेवा संकल्प अभियान” राबविण्यात येत असून, या अभियानाच्या पहिल्या उपक्रमांतर्गत शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारखाणी बु. नं. १ च्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे, वृक्षांचे महत्त्व पटवून देणे तसेच गाव परिसर अधिक हिरवागार करण्याचा संदेश देण्यात आला. पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत प्रतिनिधी, शिक्षक व ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भौतिक विकासासाठी CSR निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित समितीने कार्यक्रमास भेट देऊन शाळेच्या विकासाच्या गरजांची पाहणी केली.

टाईम्स स्पेशल

“वृक्षारोपण ही केवळ एक कृती नसून भावी पिढीसाठी हिरवेगार आणि निरोगी भविष्य घडविण्याचा संकल्प आहे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या उपक्रमासाठी ग्रामपंचायत कुंभारखाणी बु., शाळा व्यवस्थापन समिती, प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर तसेच जिल्हा परिषद प्राथ. शाळा कुंभारखाणी बु.नं.१ यांच्या वतीने सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg