loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित रांगोळी स्पर्धेत देवरुखचे विलास रहाटेनी जिंकले 1 लाखाचे बक्षीस

देवळे (प्रकाश चाळके) - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व संस्कार भारतीच्यावतीने दिवाळी निमित्ताने आयोजित "संस्कार भारती आणि पोट्रेट रांगोळी स्पर्धा: २०२६"मध्ये देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी पोट्रेट रांगोळी स्पर्धा प्रकारात विजेतेपदाचा सन्मान प्राप्त केला. विलास रहाटे यांना विजेतेपदासाठी ₹ १ लाख रुपयाचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर रांगोळी स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत प्राथमिक फेरीत २.५ फूट x ३ फूट आकाराची पोट्रेट रांगोळी साकारून रांगोळीचा ऑनलाईन फोटो पाठवून दि. ९ नोव्हेंबर, २०२६ पर्यंत सहभाग घ्यायचा होता. या स्पर्धेत प्राथमिक फेरीत सुमारे २०० स्पर्धक सहभागी झाले होते, या स्पर्धकांमधून अंतिम स्पर्धेकरिता १२ रांगोळी कलाकारांची निवड करण्यात आली. यानंतरची अंतिम फेरी गणेश मंदिर, डोंबिवली येथे पार पडली. या अंतिम स्पर्धेकरीता कलाकारांनी स्वतः स्केच करून रांगोळी साकारण्यासाठी दि. २३ नोव्हेंबर, २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० ते २४ नोव्हेंबर,२०२६ रोजी दुपारी १२:०० पर्यंतची वेळ देण्यात आली होती.

टाईम्स स्पेशल

विलास रहाटे यांनी अमेरिकन आदिवासी महिलेचा चेहरा रांगोळीद्वारे साकारला होता. रहाटे यांनी या मोठ्या यशाविषयी बोलताना सांगितले की, अनेक दिग्गज रांगोळी कलाकार यामध्ये सहभागी झाले असल्यामुळे रांगोळीसाठी फोटो निवडणे ही एक कसोटी होती. मला मनासारखा अमेरिकन आदिवासी महिलेचा फोटो मिळाला, असे रहाटे म्हणाले. आयोजकांनी दिलेल्या वेळेत स्वतः स्केच करून अजिबात विश्रांती न घेता मोठ्या मेहनतीने ही रांगोळी पूर्ण केली. कलेवर असणारी श्रद्धा व प्रेम, स्वतःच्या मेहनतीवरील विश्वास आणि माझ्या मनातील जिद्द यामुळे हा यशाचा मार्ग मला सापडला, असल्याचे रहाटे यांनी विनम्रपणे नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg