loader
Breaking News
Breaking News
Foto

अमित पिळणकर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर

बांदा (प्रतिनिधी) - सातोसे दुर्गवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक अमित पिळणकर यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव व जीवनमूल्यांची रुजवण करणे, यासाठी पिळणकर सातत्याने प्रयत्नशील आहेत. हा पुरस्कार म्हणजे शिक्षक म्हणून केलेल्या प्रामाणिक कार्याची पोचपावती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत असून सातोसे दुर्गवाडी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg