loader
Breaking News
Breaking News
Foto

वाशी तर्फे देवरुख येथे राष्ट्रीय आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण दिन उत्साहात साजरा!

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे देवरुख येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव अभियानांतर्गत’ बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून आयोडिनचे महत्त्व, आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम आणि आयोडिनयुक्त मिठाच्या नियमित वापराबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी आयोडिनच्या महत्त्वावर आधारित आकर्षक रांगोळ्या साकारल्या. ‘आयोडिनयुक्त मीठ म्हणजे निरोगी जीवन’, ‘बुद्धिमान बाळासाठी आयोडिन’ आणि ‘२१ ऑक्टोबर — आयोडिन दिन’ अशा संदेशांतून आरोग्यविषयक जागरूकतेचा प्रसार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर फलक घेऊन गावातून प्रभात फेरी काढली. ‘आयोडिनयुक्त मीठ वापरा, गलगंड टाळा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून आरोग्यविषयक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. कार्यक्रमात आरोग्य कर्मचाऱ्यांनी आयोडिनच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आरोग्यविषयक दुष्परिणाम, गलगंडाचा धोका तसेच शरीराच्या सर्वांगीण वाढीसाठी आयोडिनचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः गर्भवती महिला, बालके आणि वाढत्या वयातील मुलांसाठी आयोडिनचे योग्य प्रमाणात सेवन महत्त्वाचे असल्याचे सांगून आयोडिनयुक्त मिठाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला आरोग्य विभागातील महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय आयोडिन न्यूनता विकार नियंत्रण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाशी तर्फे देवरुख येथील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg