loader
Breaking News
Breaking News
Foto

भ्रष्टाचारमुक्त भारताचा संदेश देणारी घोषवाक्य स्पर्धा उत्साहात

खेड : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्हिजिलन्स अवेअरनेस वीक (सतर्कता जागरूकता सप्ताह) अंतर्गत दि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, खेड शाखा आणि ज्ञानदीप विद्या मंदिर स्कूल, बोरज यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ या विषयावर घोषवाक्य (स्लोगन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील सुमारे ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भ्रष्टाचारमुक्त समाज आणि पारदर्शक प्रशासनाचा संदेश देणारी विविध आकर्षक व अर्थपूर्ण घोषवाक्ये सादर केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून आणि विचारांतून भ्रष्टाचाराविरोधातील जनजागृतीचा सुंदर संदेश व्यक्त झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेतील पुरस्कार विजेते विद्यार्थी : प्रथम क्रमांक : वेदिका विशाल घोसाळकर द्वितीय क्रमांक : वेदा प्रमोद गायकर तृतीय क्रमांक : असीम इनायत पारकर या तिन्ही विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला दि न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड, खेड शाखेचे शाखाधिकारी श्रेयस मोरे, अधिकारी आशिष धवन, असिस्टंट किरण चौगुले तसेच ज्ञानदीप विद्या मंदिर स्कूलचे मुख्याध्यापक मोरे व पवार उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच भावी पिढीने भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे दि न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड, खेड शाखेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg