loader
Breaking News
Breaking News
Foto

चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी यंत्रणांची रंगीत तालीम, एनडीआरएफसह विविध विभागांचा सहभाग

देवगड (प्रतिनिधी) - संभाव्य चक्रीवादळ, अतिवृष्टी, समुद्राला उधाण आणि समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होऊन निर्माण होणार्‍या आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची सज्जता तपासण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) विजयदुर्ग व तांबळडेग समुद्रकिनारी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेण्यात आली. या मॉक ड्रिलमध्ये एनडीआरएफसह पोलीस, महसूल, आरोग्य विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचे गृहीत धरून या सरावाचे आयोजन करण्यात आले. आपत्तीची पूर्वसूचना मिळाल्यानंतर धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, घटनास्थळी बचाव पथक पोहोचविणे, अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे, जखमींना प्राथमिक उपचार देणे आणि आवश्यकतेनुसार त्यांना रुग्णालयात हलविणे, याचा प्रत्यक्ष सराव करण्यात आला.ङ्गएनडीआरएफ पथकाने आपत्तीच्या परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासह बचावकार्याची प्रात्यक्षिके केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg