loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले येथील कबड्डी स्पर्धेत केळशीच्या गजानन संघर्ष कबड्डी संघाची बाजी

दापोली (प्रतिनिधी) : श्री विठ्ठल विविध क्रीडा मंडळ आंजर्ले येथील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत गजानन संघर्ष केळशी संघाने अमर भारत टालसुरे संघावर मात करून प्रथम क्रमांकाच्या चषकावर आपले नाव कोरले. दापोली तालुक्यातील कबड्डीचा हंगाम आंजर्लेतील कबड्डी सामन्यांची सुरू होण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. येथील श्री विठ्ठल विविध क्रीडा मंडळाने ही परंपरा कायम ठेवली आहे. आंजर्ले भांडरवाडा येथील श्री विठ्ठल मंदिराचे कार्तिकी उत्सवानिमित्त हे सामने भरविण्यात येतात. यंदा या स्पर्धेत 14 संघाना प्रवेश देण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत अंतिम सामन्यात गजानन संघर्ष केळशी संघाने अमर भारत टालसुरे संघावर विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांक सीमामाता सालदुरे तर चतुर्थ क्रमांक खेमेश्वर काळकाई संघाने पटकावला. या स्पर्धांचा बक्षीस समारंभ दापोली पंचायत समिती सभापती उन्मेष राजे यांचे हस्ते करण्यात आला. या स्पर्धेसाठी शीतल फाऊंडेशन, साधनाताई बोत्रे, नितीन दरीपकर, सी. ए. उमेश तोडणकर, शरद शेलार यांनी रोख रक्कम पुरस्कृत केली तर कुमारी नीरजा नितेश देवकर याकडून सर्व कायम चषक देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पकडसाठी राजेश बोवणे, सर्वोत्कृष्ट चढाई आविष्कार साळवी तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सिद्धेश गौरत यांची निवड करण्यात आली. या सर्वांना आराध्य खेडेकर पुरस्कृत कायम चषक देण्यात आले. आंजर्ले येथील या कबड्डी स्पर्धाना संघ, क्रीडा रसिक, दाते आणि तालुका कबड्डी संघटना यांनी मोलाची साथ दिल्यामुळे या स्पर्धा यशस्वी झाल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील आणि उपाध्यक्ष संतोष मयेकर यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg