loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रहार संघटनेच्या वतीने माणगाव विभागीय बैठक व महाराष्ट्र दौर्‍याचा यशस्वी समारोप!

साई /माणगांव (हरेश मोरे) - माणगांव येथील शासकीय विश्रामगृह येथे ३ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रहार संघटना व प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेची विभागीय बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला राज्य अभियान प्रमुख महेश बडे, प्रहार संघटना कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ, राज्य सचिव सुरेश मोकल यांची प्रमुख उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या दौर्‍यादरम्यान विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महाड तालुक्यातील ३०८ सभासद, पेण २८२, पोलादपूर १२६, माणगांव ११३, श्रीवर्धन ९८, मुरुड ८४, रोहा १७, म्हसळा १६, तळा १, अशी अंतिम तालुकानिहाय सभासद नोंदणी झाली. एकूण सभासद नोंदणी १०४५ झाली आहे. हा केवळ सभासद नोंदणीचा आकडा नसून प्रहार संघटनेवरील दिव्यांग बांधवांचा विश्वास आणि संघटनात्मक ताकदीचे प्रतीक आहे.

टाईम्स स्पेशल

या संपूर्ण महाराष्ट्र दौर्‍यात मार्गदर्शन करणारे मान्यवर, मेहनत घेणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी आणि सभासद नोंदणीसाठी योगदान देणार्‍या प्रत्येकाचे संघटने द्वारे आभार व्यक्त करण्यात आले. तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढा देण्याचे या आढावा बैठकीत ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg