loader
Breaking News
Breaking News
Foto

मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, आम. दिपक केसरकर यांचेसह विविध राजकीय मंडळींची उपस्थिती

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - मोर्ले गावचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शिवसेना पदाधिकारी गोपाळ गवस यांचे गुरुवारी सायंकाळी बांबोळी गोवा येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी मार्ले येथील घरी आणण्यात आला. त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक गमावल्याचे दुःख व्यक्त करीत अनेकांनी हळहळ व्यक्त केली. गोपाळ गवस यांना काही दिवसांपूर्वी हदय विकाराचा झटका आला होता. त्यांनी मोर्ले गावचे माजी सरपंच म्हणून चांगले काम केले. सामाजिक क्षेत्रात मोठा वावर होता कोण कुठे बुडाला, अपघात झाला तर मदतीला धावून जाणे, प्रलंबित कामे होत नाही, तर शासकीय कार्यालयात जाऊन चर्चा तसेच आंदोलन करून विकास कामे पूर्ण करून घेणे, यात गोपाळ गवस नेहमी पुढे असायचे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनेकांनी गोपाळ गवस यांच्या अकाली जाण्याने शोक व्यक्त केला. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोर्ले गावात त्यांच्या निवासस्थानी सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते गोळा झाले होते. आम. दिपक केसरकर यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. शिवसेना शिंदे पक्षाचा पदाधिकारी म्हणून गोपाळ गवस काम करत होते. शुक्रवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळ गवस यांच्या पश्यात आई वडील, पत्नी, मुली, बहिणी असा परिवार आहे. गोपाळ गवस यांच्या अकाली निधनाने मोर्ले गावात शोककळा पसरली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg