रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात डेंग्यूची साथ अनेक ठिकाणी असल्याने, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील तलाव आणि शहरी भागात इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी असणार्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हिवताप नियंत्रण विभागाच्या कर्मचार्यांची मदतही जनजागृतीसाठी घेतली जाणार असल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष आणि आरोग्य समिती सभापती विलास चाळके यांनी दिली. आरोग्य समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने जिल्ह्यात डेंग्यूची साथ अनेक ठिकाणी असून, रुग्णांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर प्राधान्याने अनेक सदस्यांनी विचार व्यक्त केले.
डेंग्यू डासांच्या आळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गप्पी मासे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात असणारी पाण्याची तळी, छोटे पाणवटे यांच्यासह डासांच्या आळ्या असण्याच्या शक्यता असणार्या पाणी साठ्यांच्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यावर एकमत झाले. शहरी भागात अनेक ठिकाणी बांधकामे सुरु आहेत, याठिकाणी खोदाई झालेल्या ठिकाणी, पाणी साचलेल्या टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरी भागात नगर परिषद, नगर पालिकेच्या सहकार्याने उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले. हिवताप नियंत्रण विभागाच्या कर्मचार्यांच्या मदतीने डेंग्यूबाबत जनजागृती करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
आरोग्य विभागामार्फत शालेय पातळीवर मुलींना एचपीव्ही लस देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. परंतु पालक वर्गामध्ये याबाबत जागृती नसल्याने, या कार्यक्रमाला जिल्ह्यात खीळ बसलेली आहे. त्यामुळे पालकांमध्ये जागृती करण्यासाठी शिक्षक वर्गाने प्रयत्न करावेत यावर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यावर अधिकारी व पदाधिकार्यांचे एकमत झाले. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर चर्चा झाली. ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत कर्मचार्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत यासाठी सूचना देण्यात आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील ओपीडी वाढल्यास मदत होईल यावर चर्चा करण्यात आली.



































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.