loader
Breaking News
Breaking News
Foto

चांदोर उगवतीवाडी येथे शिवसेना (उबाठा) पक्षाचा भव्य जाहीर पक्षप्रवेश; विविध पदाधिकार्‍यांच्या नविनियुक्त्या व विकासकामांचे भूमिपूजन

रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील चांदोर उगवतीवाडी येथील ग्रामस्थांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्षप्रवेश सोहळा काल रात्री अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात संपन्न झाला. रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. याप्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना पक्ष संघटना वाढीसाठी नियुक्ती पत्रे देण्यात आली, तसेच स्थानिक विकासकामांचे भूमिपूजनही करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ध्येयधोरणांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून चांदोर उगवतीवाडी येथील गावकर दिलीप गुळेकर, सुरेश चांदोरकर, अशोक गुळेकर, मा.उपसरपंच शांताराम तांबे, विनोद शिंदे, हरिश्चंद्र गुळेकर, शामकांत गुळेकर, सुरेश गुळेकर, संजय गुळेकर, नरेंद्र गुळेकर, यशवंत गुळेकर, शशिकांत तांबे, संतोष तांबे, सतिश तांबे, शंकर तांबे, प्रकाश फुटक, विलास फुटक, मनोहर तांबे, शरद शिंदे, किरण शिंदे, सुहास गुळेकर, किरण गुळेकर, योगेश गुळेकर, संजय करसोडे, अक्षय गुळेकर, नारायण गुळेकर, राज तांबे, आयुष तांबे, तनिष चांदोरकर, सुजल फुटक, शामकांत चांदोरकर व महिला मंडळ यांनी मोठ्या संख्येने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी सर्वांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून सामाजिक व राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संघटना वाढीसाठी नवनियुक्त्या करून पक्षातील जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यावर देण्यात आली. रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या हस्ते युवासेना गोळप पंचायत समिती गणाच्या उपविभाग अधिकारीपदी योगेश पड्यार, वॉर्ड क्र. २ युवासेना शाखा अधिकारीपदी सुहास गुळेकर, उपशाखाप्रमुख पदी सतिश तांबे, गटप्रमुखपदी शशिकांत तांबे व दिनेश कुळ्ये, बुथप्रमुख पदी विनोद शिंदे व संकेत पड्यार आणि बीएलएपदी राजेंद्र बनकर यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात गावातील विकासकामांना गती देत, युवासेना गोळप पंचायत समिती गणाचे उपविभाग अधिकारी योगेश पड्यार व चांदोर गावचे उपसरपंच तथा मा. खासदार विनायक राऊत यांचे स्वीय सहाय्यक सूर्यकांत तांबे यांच्या माध्यमातून दुर्गामाता मंदिरासमोर लादी बसविणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. वाडीचे गावकर दिलीप गुळेकर व योगेश पड्यार यांच्या हस्ते नारळ फोडून हे भूमिपूजन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान उपस्थित नेत्यांनी नवनियुक्त पदाधिकारी आणि ग्रामस्थांना संबोधित करत पक्षात त्यांचे कौतुक केले आणि मोलाचे मार्गदर्शन केले. सोहळ्यात मुख्य मार्गदर्शन करताना रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका अत्यंत आक्रमकपणे मांडली.

टाईम्स स्पेशल

ते म्हणाले की, सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता, देशातील व राज्यातील शेतकरी आणि तरुण वर्ग अनेक संकटांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे हेच सध्याच्या शेतकरी व युवा तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शेतकर्‍यांच्या हक्कासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठाकरे ठासून लढा देत आहेत. हा लढा केवळ राजकीय नसून सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांचा आहे आणि चांदोर उगवतीवाडीतील ग्रामस्थांनी या लढ्यात सामील होऊन योग्य पाऊल उचलले आहे. या भव्य सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख (जिल्हासमन्वयक) रविंद्र डोळस, तालुका समन्वयक शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, माजी युवासेना जिल्हा अधिकारी (जिल्हा युवाधिकारी) प्रसाद सावंत, लांजा तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के, पावस विभागप्रमुख रविकिरण तोडणकर, आणि भाट्ये उपविभागप्रमुख राकेश भाटकर उपस्थित होते. तसेच चांदोर शाखाप्रमुख सुनील पड्यार, राजेंद्र कोलगे, सनी गोताड, ज्येष्ठ शिवसैनिक गोविंद पड्यार, उपशाखाप्रमुख दिपक कांबळे, युवासेना शाखा अधिकारी योगेश पड्यार, उपसरपंच सूर्यकांत तांबे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बनकर, साक्षी चांदोरकर, कट्टर शिवसैनिक रामचंद्र उर्फ दणक्या कोकरे, संतोष मेस्त्री व इतर सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जाहीर पक्षप्रवेशामुळे आणि नेत्यांच्या खंबीर विधानांमुळे चांदोर व गोळप परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद कमालीची वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg