loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात गुलाबी थंडीचा कडाका वाढला; रत्नागिरीचा पारा १५ अंशांच्या खाली, ग्रामीण भागात पेटल्या शेकोट्या

रत्नागिरी (जमीर खलफे) : कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा तडाखा अचानक वाढला असून कडाक्याच्या थंडीने संपूर्ण जनजीवन गारठून गेले आहे. गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा तब्बल सहा अंशांनी घसरला असून, सध्या रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील तापमान १५ अंशांच्या खाली पोहोचले आहे. वातावरणातील या अचानक झालेल्या बदलामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. ​वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी रत्नागिरीच्या ग्रामीण भागासह शहरी परिसरातही ठिकठिकाणी पहाटेच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. कडाक्याच्या थंडीत उब मिळवण्यासाठी गावागावांत नागरिक शेकोटीभोवती एकत्र येऊन गप्पांच्या माध्यमातून या आल्हाददायक थंडीचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​शेकोटीच्या उबेसोबतच आता नागरिकांचे उबदार कपडेही बाहेर निघाले आहेत. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण स्वेटर, कानटोप्या, मफलर आणि हातमोजे यांचा सर्रास वापर करू लागले आहेत. पहाटे फिरायला जाणारे नागरिक तसेच कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना या कडाक्याच्या थंडीचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे. एकीकडे थंडीमुळे दैनंदिन वेळापत्रकावर परिणाम होत असला, तरी दुसरीकडे कोकणातील या गुलाबी थंडीचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg