loader
Breaking News
Breaking News
Foto

आजगाव तांबळवाडी येथील कामाक्षी ट्रेडर्सला शॉर्ट सर्किटचा फटका, वायरमन भाऊ पांढरे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

आजगाव : आजगाव-मळेवाड मुख्य रस्त्यावरील आजगाव तांबळवाडी येथील हिराजल फॅक्टरी जवळ असलेल्या कामाक्षी ट्रेडर्स या दुकानातील एक खोलीतील सामनाला आज सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र, आजगाव येथील वायरमन दत्ताराम (भाऊ) पांढरे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या शॉर्ट सर्किटचा फटका कामाक्षी ट्रेडर्ससह आजूबाजूच्या घरांनाही बसला. परिसरातील काही घरांमधील पंखे, झुंबरे तसेच इतर विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. कामाक्षी ट्रेडर्समधील कुशन, कॉट, बंक बेड, गाद्या, खुर्च्या, टेबल, प्लास्टिक व नेटसह विविध वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आगीची घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. वायरमन दत्ताराम (भाऊ) पांढरे यांच्या कार्यतत्परतेमुळे आणि नागरिकांच्या प्रयत्नांमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठे नुकसान टळले. मात्र, या शॉर्ट सर्किटमुळे कामाक्षी ट्रेडर्समधील साहित्याचे तसेच आजूबाजूच्या घरांतील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून,परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg