loader
Breaking News
Breaking News
Foto

गोवा उपपिठातून निघणाऱ्या ‘वसुंधरा पायी दिंडी’चे १२ ऑक्टोबरला सिंधुदुर्गात आगमन; स्वागत करण्याचे सिंधुदुर्ग जिल्हा सेवा समितीचे आवाहन

​सावंतवाडी (प्रतिनिधी): जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून ११ सप्टेंबरपासून १० विविध उपपिठांवरून ‘वसुंधरा पायी दिंडी’चे नाणिजधाम येथे प्रस्थान होत आहे. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा आणि "झाडे लावा, झाडे जगवा" असा संदेश देण्याच्या उद्देशाने या विशेष दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत विविध विभागांतून निघालेल्या सात दिंड्या नाणिजकडे रवाना झाल्या आहेत. याच साखळीतील गोवा उपपिठातून निघणारी ‘वसुंधरा पायी दिंडी’ १० ऑक्टोबर रोजी गोवा येथून प्रस्थान करेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही दिंडी १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत पत्रादेवी-बांदा (सिंधुदुर्ग) सीमेवर दाखल होणार आहे. ​पर्यावरण वाचवण्यासाठी विविध संदेशांद्वारे जनजागृती करणे आणि ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करणे हा या पायी दिंडीचा मुख्य हेतू आहे. पत्रादेवी-बांदा येथे आगमन होणाऱ्या या दिंडीचे भव्य स्वागत करण्यासाठी सर्व भाविक आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg