loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार शेखर निकम यांचे दुष्काळग्रस्तांसाठी वेतन समर्पण, एका महिन्याच्या मूळ वेतनाचा धनादेश उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे सुपूर्द

चिपळूण (संतोष पिलके) : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, या संवेदनशील भावनेतून चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी आपल्या एका महिन्याच्या मूळ वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी समर्पित केला. हा धनादेश त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या या योगदानातून संकटग्रस्त शेतकर्‍यांप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकर्‍यांच्या कष्टावर असंख्य कुटुंबांचे जीवन अवलंबून आहे. मात्र, पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पाण्याअभावी शेती संकटात सापडल्यास शेतकर्‍यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहतात. अशा कठीण परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक असते. याच भावनेतून आमदार शेखर निकम यांनी आपल्या एका महिन्याच्या मूळ वेतनाचे योगदान मुख्यमंत्री सहायता निधीस दिले. दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना या संकटातून सावरण्यासाठी मदत व्हावी, हा या योगदानामागील उद्देश आहे.

टाईम्स स्पेशल

बळीराजाच्या कष्टांची जाणीव ठेवत मदतीसाठी पुढाकार घेणे, हे लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे उदाहरण आहे. संकटाच्या काळात आर्थिक मदतीसोबतच समाजाच्या पाठिंब्याची आणि आपुलकीचीही शेतकर्‍यांना गरज असते. आमदार निकम यांच्या या कृतीतून शेतकरी बांधवांप्रती असलेली संवेदनशीलता आणि माणुसकीची बांधिलकी व्यक्त झाली आहे. बळीराजा जगला, तर गाव जगेल; शेती समृद्ध झाली, तर महाराष्ट्राची प्रगती अधिक बळकट होईल, या भावनेतून केलेले त्यांचे वेतन समर्पण दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना आधार देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान ठरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg