loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब मालवणतर्फे फातिमा सेवा आश्रमात अन्नदान

मालवण (प्रतिनिधी) - लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान सेवा उपक्रमांतर्गत फातिमा सेवा आश्रमातील मुलींना पौष्टिक व सकस अन्नदान करण्यात आले. मुलींच्या आरोग्याची व पोषणाची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून फातिमा सेवा आश्रमाला मदतीचा हात देतानाच समाजातील सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. लायन्स क्लब मालवणच्या विविध सेवाभावी उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जोपसली जाते. त्याच अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, मुकेश बावकर, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, विश्वास गावकर, मनाली दळवी, अन्वेषा आचरेकर, रूपा कांदळगावकर, फॅनी फर्नाडिस आदी पदाधिकारी तसेच फातिमा सेवा आश्रमातील मुले उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg