loader
Breaking News
Breaking News
Foto

‘विकसित भारत संकल्प सभे’ला भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल (प्रतिनिधी) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवेतील ऐतिहासिक २५ वर्षांच्या प्रवासाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत उत्तर रायगड भारतीय जनता पक्षाच्या वतीने पनवेल येथील विरूपाक्ष मंगल कार्यालयात ‘विकसित भारत संकल्प सभा’ तसेच ‘सेवाज्योती पदयात्रे’चे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ स्क्रीनच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले. त्यांच्या संबोधनातून देशाच्या विकासाचा संकल्प, जनसेवेची भूमिका आणि विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला. या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेवा, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला. सेवाभावातून समाजाशी नाते दृढ करण्याचा संदेश ‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ राजकीय कार्यक्रम न राहता समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून सेवाभावाची भावना अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने राबविले जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg