loader
Breaking News
Breaking News
Foto

कसबा कालभैरव मंदिरात श्री देव कार्तिकस्वामी दर्शनयोग

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मंदिरांचे गाव म्हणून ओळख असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील श्री कालभैरव मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री देव कार्तिकस्वामी दर्शनयोग आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी उत्तररात्री ०२:०२ वाजता सुरू होणारा हा विशेष दर्शनयोग मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८:२३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या विशेष धार्मिक पर्वाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कार्तिकस्वामींचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर चोवीस तास खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती कालभैरव देवस्थान ट्रस्ट, कसबा यांच्यातर्फे देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुराणपरंपरेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या या विशेष दर्शनयोगाला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. या योगात श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्यास लक्ष्मीप्राप्तीसाठी ते लाभदायक ठरते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत महिलांनाही श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेता येते, अशी मान्यता आहे. कसबा येथील श्री कालभैरव मंदिर हे परिसरातील महत्त्वाचे धार्मिक श्रद्धास्थान असून, कार्तिकस्वामी दर्शनयोगाच्या काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. यंदाही या विशेष पर्वानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कालभैरव देवस्थान ट्रस्ट, कसबा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg