loader
Breaking News
Breaking News
Foto

सार्थक मळेकरने अडखळ येथे बनविलेल्या जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृतीला उस्फुर्त प्रतिसाद

दापोली (प्रतिनिधी) : दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रात किल्ले बनवण्याची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अडखळ येथील सार्थक मळेकर या पाचवीत शिकत असलेल्या शिवप्रेमी विद्यार्थ्यांने अरबी समुद्रातील अभेद्य 'मुरुड जंजिरा किल्ल्याची' हुबेहूब आणि अप्रतिम प्रतिकृती साकारली असून, या कलेला स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील अडखळ कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असलेल्या सार्थक संतोष मळेकर या विद्यार्थ्याने शाळेचे मुख्याध्यापक मदन रहाटवळ आणि शाळेच्या उपशिक्षिका विश्रांती फडतरे यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली साई बागकर इयत्ता दुसरी, श्री भांबीड इयत्ता पहिली, दक्ष खामकर इयत्ता तिसरी आणि अथर्व कदम इयत्ता सातवी या विद्यार्थ्याच्या मदतीने रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील जंजिरा किल्ल्याच्या प्रतिकृती साकारली आहे.

टाईम्स स्पेशल

पाण्याने वेढलेल्या जंजिरा किल्ल्याची तटबंदी, त्याचे बुरुज आणि प्रवेशद्वाराची रचना अत्यंत अचूकपणे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही प्रतिकृती तयार करताना माती, दगड, वाळू आणि पाणी या नैसर्गिक घटकांचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. मुरुड-जंजिरा हा जसा समुद्रातील एकमेव अजिंक्य जलदुर्ग मानला जातो, तसाच तो मातीत जिवंत करण्याचा प्रयत्न सार्थकने केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg