loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील श्रीराम मंदिरात त्रिपूर प्रज्वलन व तुळशी विवाह

रत्नागिरी : येथील सुप्रसिध्द श्रीराम मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळ. दि. 24 नोव्हें. 2026 रोजी त्रिपुर (दीपमाळ) प्रज्वलित करणे व तुळशी विवाह असे कार्यक्रम संपन्न होतील. या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी आवर्जुन घ्यावा असे देवस्थानतर्फे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील श्रीराम मंदिर हे एक जाज्वल्य व पुरातन मंदिर म्हणून सुपरिचित आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही त्रिपुरारी पौर्णिमेच्यादिनी तुळशी विवाह व त्रिपुर प्रज्वलित करणे हे कार्यक्रम संपन्न होतील. त्रिपूर म्हणजे दीपस्तंभ हे हिंदू धर्मशास्त्रानुसार विजयाचे चिन्ह म्हणून ओळखले जाते. त्रिपूर प्रज्वलित करण्यासाठी पारंपारिक पणत्यांचा वापर केला जातो. यावेळी सर्व उपस्थितांना त्रिपूरातील पणत्यांमध्ये स्वहस्ते तेल घालण्याची संधी देण्यात येते. त्रिपूरामध्ये तेल घालणे हे एक मोठे पुण्यकर्म मानले जाते. त्यासाठी श्रीराम मंदिरात त्रिपूर म्हणजे दीपमाळे शेजारी तेल उपलब्ध असेल. भाविक स्वहस्ते ते तेल त्रिपुराचे पणत्यांमध्ये घालतात असा रिवाज आहे. हे पुण्यकर्म असल्याने सायंकाळी त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीराम मंदिर, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे मंगळ. दि. 24 नोव्हे. रोजी सायं. ठिक 5.30 वा. तुळशी विवाह पारंपारिक पध्दतीने थाटात साजरा होईल. यावेळी सौ. मंदाताई व श्री. बाबासाहेब चौगुले हे दाम्पत्य यजमान म्हणून सर्व धार्मिक विधी यथासांग पार पाडतील. तुळशी विवाह होताच ढोल ताशांचा गजर होईल व फटाक्यांची आतषबाजी होईल. त्यानंतर सायं. ठिक 6.30 वा. त्रिपुर म्हणजेच दीपमाळ प्रज्वलित करण्याचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यासाठी विशिष्ट पध्दतीने पणत्या आणण्यात आल्या असून त्या तेल काठोकाठ भरण्यात येतील व सर्व उपस्थितांना त्यामध्ये तेल घालण्याची संधी देण्यात येईल. या सोहळ्याला प्रख्यात उद्योजक श्री. केशवराव इंदुलकर व सौ. इंदुलकर हे दाम्पत्य यजमानपद भुषवेल. यानंतर सर्व उपस्थितांना श्रीराम मंदिर देवस्थानतर्फे महाप्रसाद देण्यात येईल. तरी सर्व भाविकांनी या तुळशी विवाह व त्रिपुर कार्यक्रमाला अगत्यपूर्वक उपस्थित रहावे आणि त्रिपूर म्हणजे दीपमाळेत स्वहस्ते तेल घालून पूण्य पदरी घ्यावे, असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थानतर्फे अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg