loader
Breaking News
Breaking News
Foto

अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्याविद्यार्थ्यांची आकाशवाणी केंद्रास क्षेत्रभेट

रत्नागिरी (जमीर खलफे) : अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील वसुंधरा जिज्ञासा मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांनी रत्नागिरी आकाशवाणी केंद्रास क्षेत्रभेट दिली. आकाशवाणीचे कार्य, कार्यक्रम निर्मितीची प्रक्रिया तसेच प्रसारण तंत्र इत्यादीची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान या उद्देशाने आयोजित केलेली ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व संस्मरणीय ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी आकाशवाणीचे सहाय्यक निदेशक डॉ. सुनील गायकवाड, प्रसारण अधिकारी विवेक वानखडे, तंत्र अभियंता मनोज जॉर्ज, श्री. म. शिवलकर यांचे पुष्पगुच्छ व महाविद्यालयाचा सहकार अंक देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आकाशवाणी केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. कार्यक्रमाची संकल्पना, निवेदन, संपादन, ध्वनी, नियंत्रण आणि प्रसारणाची प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आकाशवाणीच्या माध्यमातून शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृती पर कार्यक्रम कशा पद्धतीने पोहचवले जातात, याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.

टाईम्स स्पेशल

आकाशवाणी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन प्रसारण क्षेत्रातील विविध संधी बाबत ही मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष स्टुडिओ, प्रसारण यंत्रणा पाहिल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रसार माध्यमांच्या कार्यपद्धतीचा अनुभव मिळाला. वतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपक्रमाला उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या वेळी शिक्षक दत्तात्रय माळवदे, सुनिल भोईर, नितीन पेटावे, दत्तात्रय सरगर, आदेश मुकणे, चैत्राली दळवी सहभागी झाल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg