खेड (प्रतिनिधी) : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या तिसर्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्तांच्या संबंधित शेतजमिनीच्या महसुली अभिलेखाबाबत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित जमिनीच्या ७/१२ उतार्यावरील व फेरफार अभिलेखातील नोंदीचा मूळ कायदेशीर आधार, फेरफार मंजुरी आदेश, शासन निर्णय, वाटप आदेश, ताबा अभिलेख तसेच इतर महसुली कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळाव्यात, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक भिकाजी मोहिते यांनी वरिष्ठ महसूल अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या नोंदी नेमक्या कोणत्या आधारावर घेण्यात आल्या? त्यासाठी कोणता शासन निर्णय होता? वाटप आदेश कोणता होता? ताबा कोणाला, कधी आणि कसा देण्यात आला? फेरफार मंजूर करताना कोणता आदेश आधारभूत मानला गेला? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून दीपक मोहिते यांनी संबंधित सर्व कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मागितल्या आहेत. ७/१२ उतार्यावरील नोंदीचा मूळ आधार, फेरफार अभिलेखातील नोंदीचा मूळ आधार, फेरफार मंजुरी आदेश, शासन निर्णय, वाटप आदेश, ताबा अभिलेख, इतर सर्व महसुली कागदपत्रे. ही सर्व कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यासंदर्भात यापूर्वीही संबंधित विभागाकडे लेखी निवेदने सादर करण्यात आली आहेत. तसेच तहसीलदार व उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांच्याकडून पत्रव्यवहार होऊनही मागितलेली संपूर्ण माहिती व कागदपत्रे अद्याप उपलब्ध झालेली नसल्याचे मोहिते यांनी निवेदनात नमूद केले आहे. वारंवार निवेदने देऊन, पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून माहिती मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सदर कागदपत्रे न्यायालयीन कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची असून, माहिती मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे कायदेशीर हक्कांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जमिनीच्या नोंदींचा मूळ आधारच मिळत नसेल, तर प्रकल्पग्रस्तांना न्यायालयात आपली बाजू कशी मांडता येणार? असा सवाल मोहिते यांनी उपस्थित केला आहे. संबंधित अभिलेखांची सखोल तपासणी करून मागितलेली माहिती व प्रमाणित प्रती तातडीने द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अभिलेख उपलब्ध नसल्यास त्याबाबत स्पष्ट लेखी उत्तर द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. केवळ तोंडी उत्तरे देऊन वेळ मारून नेऊ नये, तर लेखी स्वरूपात प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे मोहिते यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन विभागीय आयुक्त, सहआयुक्त (पुनर्वसन), जिल्हाधिकारी रत्नागिरी तसेच संबंधित वरिष्ठ महसूल अधिकार्यांनी हस्तक्षेप करून प्रकरणाची चौकशी करावी व संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी दीपक भिकाजी मोहिते यांनी केली आहे. कोयना धरण आणि जलविद्युत प्रकल्पासाठी अनेक गावांतील शेतकर्यांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही पूर्णपणे सुटलेला नाही. जमिनीच्या नोंदी, वाटप, ताबा याबाबत अनेक ठिकाणी गोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर दीपक मोहिते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आमच्या जमिनी गेल्या, पण नोंदीचा आधार काय, हेच आम्हाला सांगितले जात नाही, अशी भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये आहे. प्रशासनाने पारदर्शकपणे सर्व कागदपत्रे द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे. वरिष्ठ अधिकारी या निवेदनावर काय कारवाई करतात, प्रकल्पग्रस्तांना कागदपत्रे मिळतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. माहिती न मिळाल्यास न्यायालयीन लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.