loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांचे नांव इतिहासात नोंद ....,मोदींची शाबासकी, अमेरिका राष्ट्राध्यक्ष म्हणाले - हा तर जगातला हिरो...

नवी दिल्ली - दुबईहून तेलअवीवकडे १७४ प्रवाशांना घेवून निघालेले विमान एफझेड- १०७३ आकाशात हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी सहपायलटने केलेल्या हल्ल्यात जखमी होवून देखील विमानाचा ताबा सोडला नाही. सहपायलटने जोरदार हल्ला केला तरीही प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी त्याने शेवटचा उपाय म्हणून कॅप्टन मच्छार यांनी कॉकपीटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विमानातील काही प्रवाशी मच्छार यांच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी सहहल्लेखोर पायलटला बचाव करीत आवरले. त्यानंतर जखमी अवस्थेत मच्छार यांनी सुरक्षितपणे सौदीमध्येच विमान उतरवले. त्यामुळे १७४ प्रवाशांचा जीव वाचला आहे. या भव्य कामगिरीबद्दल मोदी यांनी शाबासकी दिलीच पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले हा तर जगातला हिरो.. नेतन्याहू यांनी देखील वैमानिक स्मित मच्छार यांना सलाम केला आहे. दुबई सरकारनेही भारतीय वैमानिकाचे आभार मानले आहेत.भारतीय वैमानिकाचे नांव इतिहासात नोंद झाले .भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले. गंभीर जखमी असूनही इतरांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या धैर्याला मोदी यांनी सलाम केला. त्यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली आणि त्यांच्या कामगिरीचा भारताला अभिमान असल्याचे मोदी यांनी म्हटले. मच्छार यांच्या लवकर प्रकृतीसाठीही त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारतीय वैमानिकाचे कौतुक केले. जखमी अवस्थेतही कॉकपिटचा दरवाजा उघडून मदतीचा मार्ग उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. “एका अर्थाने ते नायक होते”, अशा शब्दांत त्यांनी कॅप्टन मच्छार यांचा उल्लेख केला. ही माहिती आपल्याला नेतन्याहू आणि इतरांकडून मिळाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.भारताच्या इस्रायलमधील दूतावासाने कॅप्टन मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. जखमी असूनही अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी संयम, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा दाखवत विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे दूतावासाने म्हटले आहे. भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनीही भारतीय वैमानिकाच्या धाडसाला सलाम केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार विमानात १७४ प्रवासी होते. कॉकपिटमध्ये झालेल्या संघर्षानंतर विमान अचानक सुमारे १४ हजार फूट खाली आले. जखमी वैमानिकाने कॉकपिटचा दरवाजा उघडल्यानंतर काही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी आत प्रवेश करून कथित हल्लेखोराला रोखले. त्यानंतर विमानावरील नियंत्रण मिळवण्यात आले आणि सौदी अरेबियातील तबूक येथे विमानाचे आपत्कालीन उतरणे करण्यात आले.घटनेनंतर कॅप्टन मच्छार यांना सौदी अरेबियातील तबूक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. भारतीय दूतावास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून सौदी अधिकाऱ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, फ्लायदुबईने या घटनेची पुष्टी केली असून संबंधित अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र कॉकपिटमध्ये नेमके काय घडले आणि या घटनेमागील उद्देश काय होता, याचा तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी घटनेला अंतिम स्वरूप देणे टाळणे महत्त्वाचे आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg