loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड शहराची हद्दवाढ व यलोझोन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार : आम.अनिकेत तटकरे

कोर्लई,ता.२०(राजीव नेवासेकर)मुरुड नगरपालिकेतील नगरसेवकांना एक वर्ष पूर्ण होत आहे,त्यानिमित्ताने नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी मुरुड नगरपालिकेला भेट दिली नगरसेवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीत बोलताना अनिकेत म्हणाले कि,मुरुडला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे गेली 50 वर्ष मुरुड शहराची हद्द वाढ झाली नसल्याने शहरात यलो झोन कमी आहे.त्यामुळे नवीन बांधकाम करताना वाडी झोनमध्ये परवानगी मिळत नाही.टाऊन प्लॅनींग कार्यलयात मुरुड शहराची हद्द वाढून नवीन आराखडा बनवण्याची गरज आहे.अदितीताई मंत्री आहेत त्यांच्या मार्फत मुरुडचा नूतन आराखडा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी नगराध्यक्ष आराधना दांडेकर,मुख्याधिकारी सचिन बच्छाव,नगरसेवक आदेश दांडेकर प्रीता चौलकर,मनोज भगत,रुपेश पाटील,प्रांजली माकू,श्रद्धा अपराध, माजीनगराध्यक्ष मंगेश दांडेकर, हसमुख जैन,संजय गुंजाळ, कार्यकर्ते उपस्थित होते मुरुड शहरात गाजत असलेला 3 नंबर शाळेचा विषय चर्चेला आल्यावर वातावरण तापले मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या मनमानी कारभारावर आदेश दांडेकर प्रमोदजी भायदे,श्रीकांत सुर्वे मनीष माळी,मनोज भगत यांनी आपले मत आम.अनिकेत तटकरे यांजकडे व्यक्त केले व तातडीने शाळेबाबत झालेले बांधकाम थांबवण्याची विनंती केली. मुरुड नगरपरिषदेच्या हद्दीतील आठ सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्याच्या कामात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करीत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुर्वे यांनी यावेळी केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg