loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचे सुपुत्र दुबईचे प्रसिद्ध उद्योजक बशीर हजवानी यांना ‘दीपस्तंभ पुरस्कार २०२६’ प्रदान*

खेड (प्रतिनिधी) : महाड प्रेस असोसिएशन च्या १७ व्या वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात खेड तालुक्याचे सुपुत्र दुबईचे प्रसिद्ध उद्योजक बशीरभाई एम. हजवानी, ता. खेड, जि. रत्नागिरी यांना मानाचा ‘दीपस्तंभ पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. बशीर एम. हजवानी फाऊंडेशनच्या माध्यमातून ते सातत्याने समाजसेवा करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२०२१ च्या महाड महापुरात असो किंवा वादळामुळे बेघर झालेल्या कुटुंबांना पत्रे वाटप करून संसार उभे करण्याचे कार्य असो, तसेच गणेशोत्सव काळात महामार्गावर बंदोबस्तासाठी आलेल्या वाहतूक पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था आणि कोकण रेल्वे मार्गावर अडकलेल्या प्रवाशांना अन्न-पाण्याची सेवा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे गौरवोद्गार मानपत्रात काढण्यात आले आहेत.

टाईम्स स्पेशल

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २५/१०/२०२६ रोजी महाड येथे संपन्न झाला. यावेळी रायगडचे पालकमंत्री ना. भरतशेठ गोगावले आणि महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल खेड, महाडसह संपूर्ण कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg