संगमेश्वर, 28 सप्टेंबर (वार्ताहर) : संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे विभागप्रमुख तसेच पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव श्री. वसंतराव उजगावकर यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने कडवई परिसरावर शोककळा पसरली असून, जनसामान्यांच्या अडचणीच्या काळात धावून जाणारा, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा एक जिव्हाळ्याचा ‘आपला माणूस’ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण कडवई पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेतून श्री. वसंतराव उजगावकर यांनी सामाजिक कार्याला नेहमीच प्राधान्य दिले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पुढाकारातून शिवसेना शाखेचा शुभारंभ करण्यात आला होता. या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला होता. शाखेच्या उद्घाटनावेळी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि जनसंपर्काचे विशेष कौतुक केले होते. सर्वसामान्यांशी जिव्हाळयाचे संबंध : गावात कोणत्याही सामाजिक उपक्रमाची हाक आली, मदतीची गरज निर्माण झाली किंवा एखाद्या कुटुंबावर संकट आले, की श्री. वसंतराव उजगावकर यांची उपस्थिती हमखास असायची. पदापेक्षा माणुसकीला महत्त्व देत त्यांनी सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते.वरदानदेवीचे नि:स्सीम भक्त श्री. वसंतराव उजगांवकर हे श्री वरदानदेवीचे नि:स्सीम भक्त होते. मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. देवस्थानाच्या बाजूची संरक्षक भिंत आणि मंदिराच्या परिसरातील भक्त निवास बांधण्याच्या कामात हिरीरीने पुढाकार घेऊन मदत आणि सहकार्य केले होते. त्यांच्या सहकार्यामुळे ही कामे जलदगतीने झाली.त्यांची प्रकृती अचानक बिघडली. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. श्री. वसंतराव उजगांवकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच अवघ्या कडवई पंचक्रोशीत शोककळा पसरली.
त्यांचे पार्थिव सोमवारी रात्री उशीरा गावी आणण्यात येणार असून मंगळवारी सकाळी कडवई उजगांवकरवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने कडवई परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जनसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेला आमचा माणूस आता देवाची सेवा करण्यासाठी गेला, अशा शब्दांत ग्रामस्थ आपल्या भावना व्यक्त करत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.