loader
Breaking News
Breaking News
Foto

बीएसएनएल कंत्राटी कामगारांसाठी मनसे मैदानात..!

रत्नागिरी (जमीर खलफे) - बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांना मिळणारे अनियमित वेतन, कामगार कायद्यांतर्गत मिळणाऱ्या पीएफ, ESIC, सॅलरी स्लिप, सॅलरी बँक अकाऊंट आदी सुविधांचा अभाव, कंत्राटदाराची मनमानी याविरोधात आज मनसेने उपजिल्हा अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात धडक देऊन बीएसएनएल रत्नागिरी विभागीय अभियंता विजय भांबरे यांना जाब विचारला. कंत्राटी कामगारांवर होणारा हा अन्याय येत्या १५ दिवसात दूर करून संबंधित नाशिकस्थित ठेकेदारावर कारवाई करून कामगार कायद्याअंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ देण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका घेऊन वेळप्रसंगी या स्थानिक मराठी कंत्राटी कामगारांसाठी मनसे पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी विभागीय अभियंता विजय भांबरे, बीएसएनएल अधिकारी नंदकिशोर कदम यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून येत्या १५ दिवसांत यावर सर्वं मान्य तोडगा काढण्याचे आश्र्वासित करण्यात आले. यावेळी मनसे रत्नागिरी उपजिल्हा अध्यक्ष रुपेश जाधव यांच्यासोबत राजू पाचकुडे, रोहन शेलार, चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, सुजित घाणेकर आदी मनसे पदाधिकाऱ्यांसहित अनेक कंत्राटी कर्मचारी बांधव उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg