लांजा (प्रतिनिधी) - सामायिक जमीन जागेच्या वादातून पाच जणांनी केलेल्या शिवीगाळ आणि मारहाणीमध्ये चार जण जखमी झाल्याची घटना बुधवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पालू कुंभारवाडी येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद स्नेहल मनोहर साळवी (रा. पालू, सध्या रा. वडाळा, मुंबई) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेतील फिर्यादी स्नेहल साळवी आणि संशयित आरोपी देवळेकर कुटुंबीय हे शेजारी शेजारी राहणारे आहेत. त्यांच्यामध्ये घर परसातील जमिनीवरून सुमारे दोन वर्षांपासून वाद आहेत. त्यामुळे फिर्यादी स्नेहल साळवी यांनी सदर जमिनीची शासकीय मोजणी मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी करून घेतली होती. यावेळी स्नेहल साळवी यांची काही जमीन देवळेकर यांच्या जमिनीत तर देवळेकर यांचे सुमारे अर्धे घर स्नेहल साळवी यांच्या जमिनीत आले होते. सदर कारणावरून बुधवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजणच्या सुमारास चंद्रकांत धोंडू देवळेकर आणि दिनेश धोंडू देवळेकर हे स्नेहल साळवी यांच्या घराकडे जाऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करत आमचे घर गेले तरी बेहत्तर आम्ही सगळ्यांना सोडणार नाही, असे धमकी देऊन घराकडे निघून गेले.
यानंतर साक्षीदार नामदेव शंकर साळवी हे त्यांच्या घराकडे जाऊन तुम्ही शिवीगाळ करू नका, सामोपचाराने जो काही विषय होईल तो मिटवून घेऊ असे समजावून सांगत होते. त्यावेळी तेथे हजर असलेल्या चंद्रकांत देवळेकर याने घरातील प्लास्टिक खुर्ची उचलून नामदेव साळवी यांच्या डोक्यावर मारली तसेच शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी स्नेहल साळवी व त्यांचे वडील मनोहर शंकर साळवी व आई मधुरा मनोहर साळवी या धावत जाऊन साक्षीदार नामदेव साळवी यांना सोडविण्यास पुढे गेले. त्यावेळी सत्यवान धोंडू देवळेकर याने हातात चिव्याची काठी घेऊन फिर्यादी यांचे टी-शर्ट पकडून त्यांच्या पोटावर व पाठीवर मार दिला. यावेळी त्यांचे वडील मनोहर साळवी हे पुढे आले असता चंद्रकांत देवळेकर, दिनेश देवळेकर आणि सत्यवान देवळेकर या तिघांनी तेथे असलेल्या चिव्याच्या काट्या घेऊन फिर्यादी यांच्या वडिलांच्या पायावर व पाठीवर मारून लाथा बुक्क्याने मारहाण केली.
याच दरम्यान स्नेहल साळवी व साक्षीदार नामदेव साळवी हे घाबरून त्यांच्या घरी निघाले असता प्रभात दिनेश देवळेकर व सचिन सत्यवान देवळेकर यांनी त्यांना मारहाणी करत अंगावर धाऊन आले व शिवीगाळ करुन दमदाटी केली. या मारहाण घटनेमध्ये नामदेव शंकर साळवी, मनोहर शंकर साळवी, मधुरा मनोहर साळवी आणि स्नेहल मनोहर साळवी (रा. पालू कुंभारवाडी) हे सर्वजण जखमी झाले. याप्रकरणी लांजा पोलिसांनी चंद्रकांत धोंडू देवळेकर, दिनेश धोंडू देवळेकर, सत्यवान धोंडू देवळेकर, प्रभात दिनेश देवळेकर, सचिन सत्यवान देवळेकर (सर्व रा. पालू कुंभारवाडी) या पाच जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९ (२), १९१ (२), १९०, ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), १३१ प्रमाणे भारतीय दंड संहिता कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड. कॉन्स्टे. उर्मिला शेडे या करत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.